सोलापूर जिल्ह्यात केडर कँम्पचे आयोजन

25 Aug 2016 , 06:56:21 PM

कोणत्याही राजकीय पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची अधिक गरज असते. राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत. या तरुणांना दिशा व संधी देण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. त्यादृष्टीने, आगामी निवडणुकांसाठी चांगले व सुशिक्षित उमेदवार निवडले जावेत, हा हेतू घेऊन संपूर्ण राज्यात युवा कार्यकर्त्यांसाठी केडर कॅम्पचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसीय केडर कँम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डावखरे यांनी तरूणांशी संवाद साधला.

देशात सत्ताधारी भाजपकडून तिरंग्याच्या नावाखाली धर्माचे राजकारण केले जात आहे, हे कदापि सहन केले जाणार नाही असा इशारा देत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरदेखील तरुणांनीच पुढाकार घेऊन आंदोलन केले पाहीजे, असे मत डावखरे यांनी व्यक्त केले. यावेळी उपमहापौर प्रवीण डोंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, पद्माकर काळे, राजन जाधव, महेश गोदेकर, निरीक्षक सुरज जाधव, दिलीप कोल्हे, कय्युम बुऱ्हाण, मनोहर सपाटे, विकास लावंडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख