गणपतीपुळेमध्ये केडर कॅम्पचे आयोजन

26 Aug 2016 , 05:59:31 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. या पक्षाचे विचार, समाजोपयोगी ध्येय-धोरणे, सर्वसामान्य लोकांच्या मनात रूजवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन युवक राष्ट्रवादीचे प्रदेशध्याक्ष आ.निरंजन डावखरे यांनी केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा ग्रामीणतर्फे दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन गणपतीपुळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी डावखरे बोलत होते. या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडले. त्यांच्यासह आ.हेमंत टकले, महाराष्ट्र प्रदेश युवकचे उपाध्यक्ष नगरसेवक आदील फरास, शिबीराचे संयोजक सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद भाऊ लाड, दिलीपतात्या पाटील, ताजुद्दीन तांबोळी,सरचिटणीस सूरज चव्हाण,विराज नाईक तसेच सर्व तालुकाध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व युवकचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिबीराच्या उत्तम नियोजनाबद्दल शरदभाऊ लाड यांचा सत्कार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

निरंजन डावखरे पुढे म्हणाले की, आज सत्तेवर असणाऱ्या जातीयवादी पक्षाने या पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले आहे अनेक ठिकाणी दलितांच्यावर, मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहेत, धर्माच्या, जातीच्या नावाखाली लोकांना जखडून ठेवले जात आहे, तसेच आघाडी सरकारच्या काळातील समाजोपयोगी चांगल्या योजनांची नावे बदलून लोकांची दिशाभूल हे सरकार करत आहे. सर्व थरात हे सरकार अपयशी ठरले असून सामान्य लोकांच्या प्रश्नांशी सरकारला काहीही देणे घेणे नाही. हे सरकार फक्त धनदांडग्यांचे सरकार आहे, असा आरोप डावखरे यांनी यावेळी केला. सत्तेवर असणाऱ्या नेत्यांनीही हे मान्य केले आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे एकमेव नेते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. त्यांच्या विचारांची कास पकडत, पुन्हा एकदा नव्या उमेदीने सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, युवक राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या जातीयवादी सरकारशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन डावखरे यांनी यावेळी केले. या केडर कॅम्पच्या माध्यमातून नवीन स्फुर्ती घेऊन राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम करूया, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना नवी उमेद दिली.

संबंधित लेख