राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन

02 Sep 2016 , 06:13:59 PM

नाशिक जिल्ह्यात 'महाविद्यालय तेथे शाखा' अभियानांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात साडेचारशे शाखांची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थीनींचा या अभियानातील सहभाग लक्षणीय आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळू शकणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. यापुढे संघटनेचे दहा लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट्य आहे. दुष्काळी भागातील १७ लाख विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संघटनेने लक्ष केंद्रित केले असून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रा.वि.काँ. प्रयत्नशील असल्याचे कोते पाटील म्हणाले.


संबंधित लेख