सुशीलकुमार शिंदे हे स्वकर्तृत्व व स्वकष्टाने उभे राहिलेले आदर्श नेतृत्व - खा. शरद पवार

08 Sep 2016 , 08:58:58 PM

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, राजकारणात यश संपादले आहे. शिंदे हे स्वकर्तृत्व व स्वकष्टाने उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांचे नेतृत्व म्हणजे देशातील नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा गौरव केला. शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज शिंदे यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकुरकर, आदिंसह देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांनी आवर्जून उपस्थित राहत शिंदे यांचे अभीष्टचिंतन केले.

यावेळी बोलताना पवार यांनी शिंदेंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या राजकीय पटलावरील कारकीर्दीचा आढावा घेतला. शिंदे पहिल्यांदा करमाळ्यातून निवडून आल्यापासून ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास तसेच शिंदे यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलूंबाबत बोलताना पवार यांनी त्यांचे जन्मदिनानिमित्त अभीष्टचिंतन केले तसेच त्यांचे दिलखुलास व हसरे व्यक्तिमत्व असेच उजळत राहो, त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त केली.

संबंधित लेख