सरकार निव्वळ जाहिरातबाजी करण्यात मग्न-सुनील तटकरे

21 Sep 2016 , 06:52:23 PM

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असताना हे सरकार निव्वळ जाहिरातबाजी करण्यात मग्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंढरपूर येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा पंढरपूर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रासह राज्यातील सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. सोलापूरच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उजनी धरण कोरडेठाक पडले असताना आघाडी सरकारनेच शेतीसाठी पाण्याची सोय केली होती. कर्जमाफी, चारा छावण्या उभारून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकऱ्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न केला, पण सध्याचे सरकार ट्विटरच्या माध्यमातून फक्त टिव टिव करत आहे, अशी टीका तटकरे यांनी यावेळी भाजप सरकारवर केली. या सरकारमुळे जनतेचा भ्रमनिरास झाला असून या बिनकामाच्या सरकारला उलथून टाकायचे असेल तर आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्यास पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, आ.प्रकाश शेंडगे, प्रदिप गारटकर, आ.हणमंत डोळस आणि पक्षाचे इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख