शिवसेनेचे मुखपत्र सामनाची होळी

27 Sep 2016 , 06:05:31 PM

संपूर्ण राज्यात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मोर्च्यांची एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवणाऱ्या 'सामना' या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतींची जळगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने होळी करण्यात आली. शिवसेना आणि सामना वृत्तपत्राच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी आ. डॉ. सतिश पाटील, माजी खा. वसंतराव मोरे, माजी आ. दिलीप वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव (शहर) जिल्हाध्यक्ष परेश कोल्हे, कल्पना पाटील, राविकाँ (शहर) जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, प्रदेश सरचिटणीस अखिल चौधरी, कार्याध्यक्ष आशिष चौधरी उपस्थित होते.
मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी शांततेत मोर्चे काढत आहे. असे असताना त्यांना चिथावण्यासाठी काही विकृत मानसिकतेचे लोक काम करत आहेत, अशी टीका आमदार डॉ.सतिश पाटील यांनी केली. तसेच मंगळवारच्या अंकात सामना वृत्तपत्राने मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली

संबंधित लेख