साताऱ्यामधील भाटमरळी तालुक्यात दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन

29 Sep 2016 , 05:41:06 PM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने साताऱ्यामधील भाटमरळी तालुक्यात दोन दिवसीय केडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे उपस्थित होते.
सध्या समाजात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दाखवलेली खोटी स्वप्ने व फसव्या आश्वासनांमुळे जनतेत आणि विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड नाराजी आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. सीमेवरची परिस्थितीही अत्यंत बिकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची भाषा करत होते तेच आता पाकिस्तानमध्ये चहा पिण्यासाठी जातात, अशी टीका त्यांनी यावेळी केली. केंद्र तसेच राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्याविरोधात लढा देणार, असे प्रतिपादन निरंजन डावखरे यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थितांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुप्रिम कांबळे, गोरख नलावडे, प्रदेश संघटक सचिव बाळासाहेब महामुलकर, सचिव दिपक थोरात तसेच जिल्ह्यातील इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.

संबंधित लेख