कोपर्डी प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

07 Oct 2016 , 06:38:42 PM

कोपर्डी येथे घडलेल्या अमानुष प्रकरणात आरोपींच्या विरोधात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा, या प्रकरणात आरोपी मोकाट सुटले तर जनतेच्या संयमाचा बांध फुटेल आणि घडणाऱ्या परिणामांना सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना जनक्षोभ कळत नसेल आणि चार्जशीट दाखल होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा घणाघात सुळे यांनी केला. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. घटना घडून ८२ दिवस उलटले आहेत. ९० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल न झाल्यास आरोपी मोकाट सुटतील, अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
यावेळी आ.अरुण जगताप, आ.वैभव पिचड, आ.राहुल जगताप, आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉ. भारती पवार, जि प अध्यक्षा मंजुषा गुंड उपस्थित होत्या.

संबंधित लेख