शरद पवार यांनी घेतली शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांची भेट

24 Nov 2015 , 02:31:03 PM

कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या जन्मगावी जाऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहीद महाडिक यांच्याकुटुंबियांची भेट घेतली. या दुखःद प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास पवार यांनी महाडिक यांच्या कुटुंबियांना दिला. शहीद कर्नल संतोष महाडिक यांनी देशाप्रती केलेल्या त्यागाबद्दल, बलिदानाबद्दल समाज त्यांचा सदैव ऋणी राहील, अशी भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली. या भेटीदरम्यान विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित होते.

संबंधित लेख