राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी स्मिता पाटील यांची नियुक्ती

27 Oct 2016 , 04:33:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता रावसाहेब पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
दरम्यान, राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, अदिती नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मिता पाटील तसेच ईश्वर बाळबुधे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

संबंधित लेख