महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हल्लाबोल

28 Oct 2016 , 05:06:46 PM

सततच्या महागाईने जनता त्रस्त असून जनतेच्या सरकारविरोधातील रोषाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. पुणेकरांच्या वतीने पुण्याचे पालकमंत्री व अन्न-धान्य पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक रविंद्र माळवदकर, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बॊडके,अॅड.म.वि.अकोलकर,सुरेश बांदल, शैलेश बडदे,शशिकांत तापकीर,मिलिंद वालवडकर, राकेश कामठे, मनाली भिलारे,विपुल म्हैसुरकर,पंडित कांबळे,सुनील बनकर, सर्व सेल अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख