निवडणूकांसाठी तरुणांनी जोमाने कामाला लागावे – सचिन अहिर

08 Nov 2016 , 07:35:07 PM

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकांसाठी तरुण कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केले. सचिन अहिर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षतालुकाध्यक्षसरचिटणीस आणि विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सरचिटणीस नरेंद्र राणेमुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकरराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस परबजीत सिंगराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. निलेश भोसलेयुवती मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या ठिकाणी बोलताना अहिर म्हणाले की, दोन वर्षात जनता या सरकारला कंटाळली आहे. मुंबई महानगरपालिकेत फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर बारामतीसांगलीनवी मुंबई सारखा विकास मुंबईत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुण कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तेव्हाच पक्ष मजबूत राहील असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

संबंधित लेख