‘कमवा व शिका’ योजनेचे मानधन वाढवा - संग्राम कोते पाटील

12 Nov 2016 , 07:03:54 PM

विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. देसाई यांना कमवा व शिका योजना ही अधिक विस्तृत व व्यापक करण्यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. विद्यापीठात शिक्षण घेणारे अनेक गरजू विद्यार्थी कमवा व शिका योजने अंतर्गत काम करतात. वाढता शैक्षणिक खर्च आणि मेसची फी याबद्दलची विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता तासामागे पाच रुपये वाढून देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. सध्या एका तासाला दहा रुपये प्रमाणे तीन तासाचे ३० रुपये मिळत आहेत. यात पाच रुपयांची वाढ केल्यास दिवसाला ४५ रुपये मिळू शकतील आणि विद्यार्थी आपला खर्च काही प्रमाणात तरी भागवू शकतील, अशी अपेक्षा आहे. 
वरील मागणीसोबतच एखादा विद्यार्थी काही कारणाने एखाद्या दिवशी अनुपस्थित राहिल्यास इतर दिवसांमध्ये जास्तीचे काम करून त्याला तास भरून काढण्याची मुभा देण्यात यावी, हि सुद्धा मागणी करण्यात आली आहे.
सध्या हजारो विद्यार्थी या योजनेमध्ये काम करत शिक्षणही घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा विचार करण्यात यावा व लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा ही विनंती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष ऋषी परदेशी तसेच निखिल बटवाल, विक्रम जाधव, शुभम माताळे, प्रतिक पुंड, तसेच शहर उपाध्यक्ष विशाल मोरे, अक्षय मुरकुटे तसेच शहर पदाधिकारी तेजस जाधव, राज पाटील, ऋषिकेश कडू, संदीप कन्हेरकर, शैलेश मुनावत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख