पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेऊन चर्चा केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित 'शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी शरद पवार यांची कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत स्तुती केली. पवार कितीही दमलेले असले तरी शेतीचा प्रश्न समोर आल्यावर तो ते आपुलकीने सोडवतात. शरद पवार यांनी माझं बोट पकडून कायम मला शेतीचे धडे दिले आहेत, असे वक्तव्य मोदी यांनी याठिकाणी केले. तसेच सार्वजनिक आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पवार यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करतात त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संशोधन आणि विकासाचे कार्य करत आहे त्यामुळे केंद्र सरकारने या संस्थेला मदत करावी, अशी मागणी केली. तसेच, ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार एकत्र कसे काम करतील यासाठी सरकारने धोरण ठरवणे आवश्यक आहे, असे वक्तव्यही पवार यांनी याठिकाणी केले.
ऊसाच्या लागवडीतील नवीन तंत्रज्ञानाविषयी, नवीन बियाण्यांविषयी, खतांविषयी तसेच ऊस पिकाच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी मोदी यांनी संस्थेच्या संशोधकांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री, पालकमंत्री गिरीश बापट, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि कामगारांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि अन्य प्रमुख नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नी केंद्र आणि राज्यातील सरकारला धारेवर धरले आहे. नुकतेच काँग्रेस अध्य ...
पुढे वाचाकळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.नरेंद्र मोदी यांच्या सर ...
पुढे वाचामुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष जयदेव गायकवाड, आमदार प्रकाश गजभिये, विभाग समन्वयक व सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील व संपूर्ण राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्षांचा भारतीय संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.राज्यात सरकारविरोधात सामाजिक प्रबोधनात्मक मेळावे व शिबीरे घेण्याची गरज आहे. सर्व समाजघटकांना ...
पुढे वाचा