विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा - प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे

16 Nov 2016 , 07:48:51 PM

गेवराई शहरातील मागच्या सतरा वर्षांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे.

गेवराई नगर पालिका निवडणुकीत आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ आणि प्रभागातील सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. अमरसिंह पंडित हे अतिशय अभ्यासू आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व आहे. वरिष्ठ सभागृहात त्यांनी गेवराईच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे मांडले. शेती आणि पाणी या विषयावर सातत्याने सरकारला धारेवर धरण्याचे काम पंडित करत आहेत. खासदार शरद पवार साहेब या वयातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पोटतिडकीने बोलतात त्यांचे कृषी विषयक धोरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मार्गदर्शक ठरत असल्याचे पुणे येथील कार्यक्रमांमध्ये मोदीजींनी मान्य केले असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना तटकरे म्हणाले की, आज जे आमच्या पक्षाचे आहेत तेच आमचे आहेत आणि त्यांनाच निवडून देण्याचे आवाहन तटकरे यांनी केले.

या सभेला आ. विक्रम काळे, बीड जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, आ.अमरसिंह पंडित, जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

संबंधित लेख