नाशिक ग्रामीण राष्ट्रवादीत इनकमिंग सिन्नर पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

24 Nov 2016 , 05:15:28 PM

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सौ. भारती भोये यांच्यासह हरसूल व ठाणापाडा गटातील शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या उपस्थितीत पक्षामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला असून आगामी काळात देखील विविध पक्षांमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असून त्याबाबत योग्य ती चाचपणी केल्यानंतरच त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येईल असे अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी सांगितले.

सद्यस्थितीत सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने वेळोवेळी शेतकरी विरोधी धोरणे अवलंबल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सहकारी बँकांना नोटा बदलून देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे सहकारी बँकेमध्ये खाते आहे. त्यामुळे सरकारने नुकत्याच घेतलेल्या नोट बंदीच्या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर बसत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे आयोजित प्रवेश सोहळ्याप्रसंगी अॅड. पगार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, कार्याध्यक्ष अरुण मेढे, जेष्ठ नेते हिरामण खोसकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, रविंद्र भोये, विनायक माळेकर, मोतीराम दिवे, भारती भोये, कविता वाघेरे, कैलास मोरे, रविंद्र गामणे, आदी उपस्थित होते.

संबंधित लेख