स्पर्धा परीक्षांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा डिसेंबरमध्ये मोर्चा – संग्राम कोते पाटील

24 Nov 2016 , 07:18:08 PM

गेल्या दोन वर्षांपासून कुठल्याही स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती व जागा न निघाल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना केली.
याप्रसंगी शहराध्यक्ष ऋषी परदेशी, विशाल मोरे, विक्रम जाधव, सुभाष मातेळे, अक्षय मुरकुटे उपस्थित होते.

पुढील महिन्यात होणाऱ्या पुणे माहानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस मेळावा घेणार असून, आगामी महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी मोठे पाठबळ उभे करेल. असेही संग्राम कोते पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख