रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेऊ – सुनिल तटकरे

24 Nov 2016 , 07:32:10 PM

रत्नागिरी नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेऊ असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आय. आघाडीच्या झालेल्या या एकत्रित मेळ्याव्यात ते बोलत होते. काँग्रेसचे माजी खा. निलेश नारायण राणे देखील यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व नगरसेवक, पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ आज रत्नागिरी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना तटकरे यांनी सांगितले की सागरी महामार्ग असो की पुलाची बांधकामे रत्नागिरीत अशी विविध काम आमच्या काळी झाली. आज रत्नागिरी शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांचा लोढा प्रचंड आहे. एक काळ असा होता की, मच्छीमारांना स्वतंत्र पॅकेज नव्हते. २००३ ते २००४ या आघाडी सरकारच्या काळात मच्छीमारांसाठी स्वतंत्र्य पॅकेजची घोषणा झाली. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. माझ्याकडे मत्स्यव्यवसाय खात्याचा कारभार आला होता. राज्याच्या निर्मितीच्या नंतर सर्वप्रथम मच्छिमारांना पॅकेज देण्याचं काम माझ्या सारख्या कार्यकर्त्याने केले आहे. मी स्वत: पुढाकार घेऊन मच्छीमारांना वेगळे पॅकेज देण्याचे सुचविले होते, याचा उल्लेख तटकरे यांनी या ठिकाणी बोलताना दिली.

संबंधित लेख