रुबी हॉस्पिटल बाहेर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धिक्कार आंदोलन

25 Nov 2016 , 08:32:33 PM

गेल्या रविवारी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्विकारण्यास मुंबईतील जीवन ज्योत रुग्णालयाने नकार दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाचप्रकारे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाच्या हृदयाला त्रास असल्याने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना साडेतीन लाख रुपये कॅश भरण्यास सांगितले.

खुंटे यांनी तातडीने दीड लाख रुपये रोख रकमेच्या स्वरुपात, तर काही रक्कम करंट अकाउंटच्या स्वरुपात भरण्याची तयारी दाखवली. परंतु रुग्णालय प्रशासनाला सर्व रक्कम रोख स्वरुपात हवी असल्याने, त्यांनी बाळावर उपचार करण्यास असहकार्य केले. त्यातच संध्याकाळी सहा वाजता बाळाचे अवयव काम करणे हळूहळू कमी होत असल्याने, शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं, पण पहाटे बाळ दगावले.
एकीकडे या देशाचे पंतप्रधान आपल्या आईला पैशांसाठी रांगेत उभे करुन नौटंकी करतात तर दुसरीकडे या देशात एका आईला नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाळाला उपचार देता आले नाही यामुळे ते बाळ दगावले या सरकारचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे, या घटनेचा राष्ट्रवादी युवक कॉंगेसच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला .उद्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे.

या आंदोलनात शहर अध्यक्ष राकेश कामठे , प्रदेश उपा. रवि वर्पे , सरचिटणीस मयुर गायकवाड , नितीन राठोड , विनोद काळोखे ,अच्युत लांडगे,सनी किरवे, संतोष गायकवाड,किशोर कांबळे,अभिजीत बारव्कर , विक्रम मोरे,इम्म्तियाज मोमिण, शेर अली शेख , प्रमोद शिंदे ,रोहित जसवंते उपस्थित होते.

संबंधित लेख