भाजपमुळे देशाची धर्मांधतेकडे वाटचाल - डॉ. फौजिया खान

29 Nov 2016 , 06:53:28 PM

भोकरदन नगरपालिकेसाठी जालना जिल्ह्यात तर धरणगाव नगरपालिकेसाठी जळगाव जिल्ह्यातील प्रचार सभेत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. फौजिया खान यांनी भाजपवर टीका केली.
सध्या देशभर जे काही चालले आहे त्यावरुन निश्चितपणे असे म्हणता येईल की भारताची वाटचाल अतिरेकी धर्मांधता, अतिरेकी राष्ट्रवाद आणि असहिष्णुतेकडे चालली आहे. पुरोगामी, डाव्या आणि सर्वच विवेकी लोकांचे देखील हेच मत आहे.

सध्याच्या निवडणुकीत भाजप पैसा वाटप करत असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. सध्या देशाला चलनतुटवडा भासत असताना भाजपकडे नवीन चलनी नोटा कुठून आल्या हे समजत नाही.

देशात लोकशाहीला हानिकारक वातावरण तयार झाले असून देशभक्ती आणि देशद्रोहाच्या व्याख्या ठरविण्याचा जणू भाजपने स्वयंघोषित अधिकारच प्राप्त करून घेतला असल्याचे त्या म्हणाल्या.

संबंधित लेख