मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारचा पुन्हा नन्नाचा पाढा – आ. शशिकांत शिंदे

15 Dec 2016 , 06:34:24 PM

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी प्रमुख लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबाबत उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  शशिकांत शिंदे  यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की भाजपा सरकारने मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि धनगर समाजाला निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिल होतं ते पाळण्याची संधी मुख्यमंत्र्यांना आज होती. पण, मागच्याच निवडणुकीच्या असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आज त्यांनी मागच्या आरक्षणाच्या चर्चेच्या उत्तराची पुनरावृत्ती केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शैक्षणिक दृष्टीकोनातून मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षणासाठी ज्याप्रमाणे शाहू महाराजांच्या बाबतीमधली योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, त्याच पद्धतीने या राज्यातल्या मुस्लिम समाजालाही नोकऱ्या आणि शिक्षणाच्या संदर्भात संधी देण्याचे जाहीर केले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की आज मुख्यमंत्र्यांच्या या चर्चेमध्ये अॅट्रोसिटी कायद्याच्या गैरवापराबद्दल कमिटी नेमण्यात आली. अॅट्रोसिटी कायदा रद्द करा अशी कोणाचीही मागणी नाही परंतु त्याबाबत कमिटी नेमली. त्याचबरोबर त्यामध्ये असलेल्या इतर मागण्यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने आज सरकारने, मुख्यमंत्र्यांनी राज्यातला ज्वलंत प्रश्न फक्त चर्चेने सोडला त्याचा आम्ही निषेध करतो, असेही याप्रसंगी शिंदे यांनी सांगितले.

संबंधित लेख