उल्हासनगर येथे महिला डॉक्टर अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय - आ.ज्योती कलानी

15 Dec 2016 , 06:46:55 PM

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील शासकीय प्रसुतीगृहात स्त्री रोग तज्ज्ञांच्या अभावी गरोदर स्त्रियांची होत असलेल्या गैरसोयीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार ज्योती कलानी यांनी तारांकित प्रश्नाव्दारे सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी बोलताना आ.ज्योती कलानी म्हणाल्या की सध्या उल्हासनगर येथील शासकीय प्रसुतीगहात स्त्रीरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून या रुग्णालयांची खाटांची क्षमता ५० वरुन १०० खाटांपर्यंत वाढविली. परंतु तेथील महिला डॉक्टर तीन वर्षापासून अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था राज्यातील शासकीय रुग्णांलयांची असून सरकार याबाबत कोणती कार्यवाही करणार असा सवाल आ.ज्योती कलानी यांनी विधानसभेत केला.

यावर आरोग्यमंत्री दीपक सांवत यांनी राज्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले. तसेच उल्हासनगर येथील जी स्त्रीरोग तज्ज्ञ दीर्घ रजेवर गेली आहे. त्यांना पाचवेळा नोटीस पाठविण्यात आली असून दीर्घ रजेवर गेलेले राज्यभरात अशा प्रकारचे ४९७ डॉक्टर्स आहेत. त्यापैकी ९९ डॉक्टर्सवर कारवाई करण्यात आली असून येत्या दोन महिन्यात उर्वरित डॉक्टर्सवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली.

संबंधित लेख