'प्रा. ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यानाचा' लोकार्पण सोहळा संपन्न

04 Jan 2017 , 06:45:37 PM

पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या प्रयत्नांनी विकसित केलेल्या हडपसर येथील 'प्रा. ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यानाचा' लोकार्पण सोहळा खा. शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. "प्रा. ग. प्र. प्रधान सर हे माझे इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांनी विधिमंडळात केलेले कार्य आजच्या विधिमंडळ सदस्यांसाठी मार्गदर्शन करणारे आहे. विधिमंडळात टीका करताना त्यांनी वैयक्तिक कटुता कधीही येऊ दिली नाही. त्यांचे संपूर्ण जीवन त्यागी, समाज घडवणारे व समाजाच्या तळागाळातील जनतेशी नाळ जोडणारे होते", अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हडपसर हे समाजवादी चळवळीचे केंद्र होते. तेव्हापासून त्यांचा हडपसर गावाशी संबंध होता. अशा आदर्श व्यक्तीची आठवण ठेवून हडपसरवासीयांनी त्यांच्या नावाने 'नक्षत्र उद्यान' विकसित केल्याने मला मनापासून आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख