शरद पवार साहेब तरुण पिढीसाठी खरे आयकॉन- सुनिल तटकरे

16 Jan 2017 , 06:29:23 PM

सुवर्णगाथा ५० या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीला बोलते करण्यात आले. या निमित्ताने शरद पवार साहेबांचा थक्क करणारा प्रवास तरुण वर्गाने मांडला. आजची पिढी ही अत्यंत कर्तृत्ववान असून पवारसाहेब या पिढीसाठी खरे आयकॉन आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथे आयोजित 'सुवर्णगाथा ५०' राज्यस्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या सर्व स्पर्धकांचे तटकरे यांनी अभिनंदन केले तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख