राज्यातील लाखो विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार - अजित पवार

16 Jan 2017 , 06:29:24 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राज्यातील विद्यापीठ उपकेंद्रांचा प्रश्न हाती घेऊन प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत सात मोर्चे काढले आहेत. विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढत हा प्रश्न लावून धरला होता. आम्ही हा प्रश्न येत्या अधिवेशनात सभागृहात लावून धरणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात, शिवाजी विद्यापीठाचे सांगली व सातारा जिल्ह्यात, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे धुळे जिल्ह्यात तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र बीड जिल्ह्यात व्हावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत सातत्याने लढा दिलाय. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सदर मोर्चांना हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संबंधित लेख