देश हा खादीचा, नाही नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार

16 Jan 2017 , 06:40:03 PM

खादी-ग्रामोद्योग आयोगाकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज बारामती येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. 'देश हा खादीचा, नाही नरेंद्र मोदींचा', 'एक रुपया चांदीचा, हा देश गांधींचा', अशा घोषणा देत युवकांनी खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या कृतीवर जोरदार टीका केली. स्वदेशीची चळवळ उभारणाऱ्या महात्मा गांधींनी नेहमीच खादीचा आग्रह धरला. त्यांच्या विचारप्रणालीतून खादी आणि ग्रामोद्योगाचा देशभर प्रसार झाला. खादी व ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून त्यांचे छायाचित्र काढणे हा गांधीजींचा अपमान असल्याचे आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरजंन डावखरे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रसचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांच्यासहित बारामती युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, तालुका अध्यक्ष राहूल वाबळे यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.

संबंधित लेख