राज्याच्या पत्रकारितेला स्व. गर्गे यांनी दिशा दिली – शरद पवार

17 Jan 2017 , 06:55:34 PM

लोकसत्ता दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांना स्व. स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याच्या पत्रकारितेला स्व. स. मा. गर्गे यांनी योग्य दिशा दिली. त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय ही अभिमानाची बाब आहे. आजपर्यंत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले ते सर्वजण भारतातील मोठे पत्रकार आहेत, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी यावेळी केले. वर्तमानपत्रातील अग्रलेख हे आम्हा राजकारण्यांना दिशा देण्याचे काम करत असतात. आज अग्रलेखापेक्षा ‘पेज थ्री’ला खूप महत्त्व आले आहे. परंतू याही काळात वाचलाच पाहिजे असा अग्रलेख लोकसत्ताचा आहे. गिरीश कुबेर यांचे अग्रलेखाचे विषय आणि भाषा विचार करायला लावणारी आहे. आखाती देशात तेलाबद्दल काय होतंय, ते कुबेर यांच्यामुंळेच कळतं, असेही पवार म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धंनजय मुंडे , राज्यसभा सदस्य रजनी पाटील, आ. जयदत्त क्षिरसागर , आ.अमरसिंह पंडित, आ.भीमराव धोंडे, आ.आर.टी. देशमुख, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी राज्यमंत्री सुरेश धस, माजी आ.उषा दराडे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, सभापती संदिप क्षीरसागर, माहिती संचालक यशवंत भंडारे, जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मानूरकर, म.रा.मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष वसंत मुंडे यांची उपस्थिती होती.
 

संबंधित लेख