आमदार विक्रम काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

18 Jan 2017 , 06:34:07 PM

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच विविध शिक्षक संघटनांचे अधिकृत उमेदवार आ. आमदार विक्रम काळे  यांनी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी-काँग्रेस पदाधिकारी, विविध शिक्षक संघटना व शिक्षक बांधवांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज दाखल केला. शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने विधिमंडळात आवाज उठवणारे, शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, शिक्षणप्रीय, अभ्यासू आमदार विक्रम काळे यांना बहूमताने विजयी करण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

संबंधित लेख