६८ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा

27 Jan 2017 , 06:41:49 PM

भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार हेमंत टकले, आमदार विद्या चव्हाण, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व सेवादलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख