राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती

30 Jan 2017 , 10:58:17 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटकपदी बापूसाहेब डोके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले यांच्या हस्ते डोके यांना आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सरचिटणीस मुनाफ हकीम, चिटणीस संजय बोरगे उपस्थित होते. उपस्थितांनी डोके यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. 


संबंधित लेख