जि.प आणि पं. स निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे- अजित पवार

31 Jan 2017 , 06:44:04 PM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने तयार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी मेळावेही घेतले जात आहेत. सोमावरी पुण्यातील भोर, वेल्हे, मुळशी येथील जाहीर मेळाव्यांना उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री सत्तेत असूनही विरोधी पक्षनेते असल्याप्रमाणे भाष्य करत आहेत, अशी टीका यावेळी पवार यांनी केली. युतीवरून शिवसेना-भाजपमध्ये टोकाचे वाद सुरू आहेत. एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. राज्यात याआधी असे कधी घडले नाही, हा फार दुर्दैवी व अशोभनीय प्रकार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देऊन निवडून आणा, असे आवाहन पवार यांनी उपस्थितांना केले.

संबंधित लेख