राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची ४ फेब्रुवारीला मुंबईत जाहीर सभा

03 Feb 2017 , 06:59:19 PMयेत्या ४ फेब्रुवारीला मुंबई मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ फोडणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या ४ फेब्रुवारीला मानखुर्द येथे संध्याकाळी ६ वाजता पक्षाची सभा होणार आहे. या सभेद्वारे मनपा निवडणुकींच्या प्रचाराचा नारळ पक्षातर्फे फोडला जाईल. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष  सचिन अहिर  यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, यावेळी काँग्रेसचे वर्तमान नगरसेवक वकिल शेख आणि नेहा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुधाकर वड्डे, मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुबारक खान, माजी आमदार अशोक धात्रक, माजी नगरसेवक रवींद्र पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख