८० लाख विद्यार्थ्यांशी बांधिलकी जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष

06 Feb 2017 , 11:33:12 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडले गेले आहेत. गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यार्थ्यांशी एक नाळ जोडली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा 'महाविद्यालय तिथे शाखा' हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस हा ८० लाख विद्यार्थ्यांशी बांधिलकी जपणारा एकमेव पक्ष बनला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी मैदानात उतरली. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक लढ्यात विद्यार्थ्यांना साथ देत त्यांची वज्रमुठ आणखी बळकट केली. गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यभरातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवल्या गेल्या होत्या. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सर्व विभागीय समाजकल्याण कार्यालयांवर मोर्चे काढून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रलंबित शिष्यावृत्ती मिळवून दिल्या. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ पाहणाऱ्या नीटची परीक्षा देणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून थोडा दिलासा मिळाला. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विद्यार्थ्यांचे एक विश्वासाचे नाते तयार झाले आहे. विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आशेने पाहत आहे.

संबंधित लेख