औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम काळे विजयी

07 Feb 2017 , 06:31:34 PM


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम काळे यांचा दमदार विजय झाला आहे. तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाचे शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुधीर तांबे यांचा देखील विक्रमी मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीनही विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन...
शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे शिक्षक आमदार अशी विक्रम काळे यांची ओळख मागच्या टर्ममध्ये झाली होती. त्यामुळे मराठवाड्यातील शिक्षकांनी पुन्हा एकदा विक्रम काळे यांना आपले प्रतिनिधीत्व करण्यासाठी विधिमंडळात पाठवले आहे.

संबंधित लेख