पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अजित पवार यांनी फोडला

08 Feb 2017 , 12:07:40 AM


राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवारी नारळ फोडला. पुण्यातील जाहीर सभेच्या माध्यमातून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. सभेला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सकारात्मक वातावरण आहे हे यातून दिसून आले. राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिल्यानंतर सर्वांगीण विकास कसा होतो हे आपल्याला पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्यावर दिसते, तेव्हा पुणेकरांनी देखील राष्ट्रवादीला बहुमताने निवडून द्यावे म्हणजे येणा-या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराचा अधिक विकास करू शकेल, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

संबंधित लेख