आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल- सुनील तटकरे

08 Feb 2017 , 12:34:44 AMआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर , डॉ. भारतभुषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा, शेख शफिक, नारायण शिंदे उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे कौतुकास्पद आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व मनपा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश मिळविणार यात शंकाच नाही.

संबंधित लेख