फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळे यांनी साधला लोकांशी संवाद

10 Feb 2017 , 07:04:16 PM

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळे  यांनी लोकांशी संवाद साधला. सुळे यांनी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरही भाष्य केले, तसेच नेटिझन्सच्या विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरेही दिली. स्थानिक निवडणुकांमध्ये हार्दिक पटेलला आणून शिवसेना काय साध्य करू इच्छिते हेच कळत नाही, असा टोला सुळे यांनी शिवसेनेला लगावला. महानगरपालिका निवडणुका या स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर लढल्या जातात. शिवसेना-भाजपमधील नेते हे फक्त सत्ताप्रेमी आहेत. त्यांना विकासाशी काही एक देणे-घेणे नाही. भाजप-शिवसेनेचे लोक सत्तेत राहून फक्त स्वतःचा फायदा करून घेत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संबंधित लेख