राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे - अजित पवार

11 Feb 2017 , 08:43:24 PMराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नेहमीच साथ लाभली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केले. ते परतूर येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत भाजपच्या राज्यातील मनमानी कारभारावर सडकून टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे  लोकांना प्रलोभने दाखवण्याचे काम करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अचारसंहितेचे भंग करणार का? याचे उत्तर दानवे यांनी द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तर गुंडांचे मुख्यमंत्री असल्याप्रमाणे बेताल वक्तव्ये करत आहेत. शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादामुळे मनोरंजन होत आहे, पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे काय? त्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

संबंधित लेख