शेतकऱ्यांच्या दुर्दशेला सरकारच जबाबदार –सुप्रिया सुळे

13 Feb 2017 , 04:40:15 AM


राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पीके उपटून फेकावी लागत आहेत. देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात होत आहेत. शेतकऱ्यांच्या या दुर्दशेला सेना-भाजपा सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्या उस्मानाबाद येथे आयोजित सभेत बोलत होत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी आता कोणावर ३०२ कलम लावू? असा जळजळीत प्रश्न सुळे यांनी सरकारला केला. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवारांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी, आंबेजवळगा येथे प्रचार सभा घेतल्या. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आंबेजवळगा गटाच्या उमेदवार कांचन वाघमारे, पाडोळी गटाच्या सक्षणा सलगर यांच्यासह मोहन साबळे,शिंगोली गणातील विद्या रणखांब, सुवर्णा इरकटे उपस्थित होते.

संबंधित लेख