आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती

11 Dec 2015 , 08:21:41 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रीय राजकारणातले सर्वपक्षीय दिग्गज नेते, तसेच उद्योग, क्रीडा क्षेत्रातील महनीय उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस पक्षाध्यक्षा मा. सोनिया गांधी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुला, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख सीताराम येचुरी असे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी आदरणीय शरद पवार यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवारही व्यासपीठावर उपस्थित होत्या.

शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या 'ऑन माय टर्म्स', 'लोक माझे सांगाती' आणि 'गौरवग्रंथ' या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

समारोहाचे प्रास्ताविक खासदार प्रफुल पटेल  यांनी आणि आभार प्रदर्शन खासदार सुप्रिया सुळे  यांनी केले.

संबंधित लेख