स्व. वसंतदादा पाटील यांचे विचार नव्या पिढीत रुजायला हवे – शरद पवार

01 Mar 2017 , 10:23:03 PM


सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी स्व. वसंतदादा पाटील यांनी आयुष्यभर अविरत कष्ट केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. वसंतदादा पाटील यांचे विचार नव्या पिढीत रुजायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांचा विचार वृद्धिंगत करण्यासाठी आपण पावले टाकली तर राज्याही विधायक मार्गावर जाऊ शकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. वसंतदादा पाटील यांच्या २८ व्या पुण्यातिथीनिमित्त मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठांन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख