मुंबई म.न.पा नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची घेतली भेट

02 Mar 2017 , 08:46:57 PM


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ९ उमेदवार निवडणुकीत जिंकून आले, या ९ पैकी ८ महिला उमेदवार असून या विजयी नगरसेविकांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, माजी खा. संजय दिना पाटील उपस्थित होते.
सध्या मुंबईचा महापौर कोण होणार? या विषयावर चर्चा रंगत असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका ही ‘वेट अँड वॉच’ची असेल. ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर आमचं बारीक लक्ष आहे आणि या सर्व गोष्टींवर चर्चा करून आम्ही पक्षाची पुढची भूमिका ठरवू, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सारखेच असल्याने आम्ही दोघांनाही मदत करणार नाही, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचा त्यांनी पुनरोच्चार केला.

संबंधित लेख