स्त्रियांचा अवमान करणाऱ्या शक्तींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार-शरद पवार

02 Mar 2017 , 09:07:15 PM

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गुरमेहर कौर या मुलीला येणाऱ्या धमक्या हा काही पहिला प्रसंग नसून दुर्दैवाने देशाची सूत्रे ज्यांच्या हातात आहेत, त्या घटकांकडून स्त्रीचा सन्मान ही बाब शिल्लकच राहिली नसल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार  यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. गुरमेहरने तिचे मत व्यक्त केले. त्या मताच्या विरुद्ध असलेल्या घटकांकडून तिला धमक्या देण्याचे काम केले जात आहे. गलिच्छ संदेश पाठवले जात आहेत. ज्यांचा लोकशाहीवर आणि स्त्री व कन्या सन्मानावर विश्वास आहे, त्या सर्वांनी अशा विघातक प्रवृत्तींविरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. स्त्रियांचा अवमान करणाऱ्या शक्तींचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवक व विद्यार्थी संघटनेला स्पष्ट सूचना दिल्या असून राष्ट्रवादीच्या विविध संघटना पुढाकार घेऊन या प्रवृत्तींविरोधात लढत आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख