मतदारयाद्यांतील घोळाविरोधात उच्च न्यायालयात पीआयएल करण्यात आली आहे.हा लोकशाही अधिकारांच्या रक्षणाचा प्रश्न- जितेंद्र आव्हाड

07 Mar 2017 , 07:05:17 PM


राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचा मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला. २०१४च्या निवडणुकांमध्ये ज्यांनी मतदान केलं, अशा हजारो लोकांचे नाव यावेळी मतदार याद्यांमध्ये नव्हते. अनेकांच्या नावात, पत्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. याविरोधात उच्च न्यायालयात एक पीआयएल दाखल करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेऊन हा घोळ दुरूस्त करावा अशी मागणी या पीआयएल मार्फत करण्यात आली आहे. हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रश्न नाही तर संपूर्ण लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांना वाचवण्याचा प्रश्न आहे, असे प्रतिपादन आव्हाड यांनी यावेळी केले.

संबंधित लेख