'महाराष्ट्र श्री' सुनीत जाधवला शासकीय सेवेत घेण्याची राष्ट्रवादीची मागणी

09 Mar 2017 , 06:33:35 PM


राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता महाराष्ट्राचा खेळाडू सुनीत जाधवला यास शासकीय सेवेत 'वर्ग एक' अधिकारी म्हणून सामावून घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अनिकेत तटकरे यांच्यासह शरीररसौष्ठव क्षेत्रातील मान्यवरांनी आज यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तसेच सुनीत जाधव यास तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तीन वेळा विजेता ठरलेल्या विजय चौधरी यालाही शासकीय सेवेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासनही अद्याप पूर्ण झाले नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन दिले

संबंधित लेख