शेतकरी आत्महत्यांना सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे चुकीचे धोरण कारणीभूत - धनंजय मुंडे

09 Mar 2017 , 09:11:35 PM


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून आज विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात राज्यातील १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दोन वर्षांत ९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. या सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे चुकीचे धोरणच याला कारणीभूत आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. परंतु सभापतींनी हा प्रस्ताव फेटाळला. पण कर्जमाफीच्या मागणीसाठी सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याने विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, सभागृह नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी आ. प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्या निलंबनाच्या निर्णयाचे विरोधी पक्षनेते नंजय मुंडे यांनी स्वागत केले. परंतु त्यांच्या चौकशीसाठी जी समिती गठीत केली जाणार आहे, त्याचा अहवाल आगामी पावसाळी अधिवेशनात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संबंधित लेख