आ. प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड

09 Mar 2017 , 11:35:16 PM


आमदार प्रशांत परिचारक यांचे आक्षेपार्ह वक्तव्य सैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे, ते वक्तव्य देशद्रोही आहे, असा अभिप्राय व्यक्त करत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. प्रशांत परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील  यांनी दिली त्यावर प्रतिक्रिया देत असताना आव्हाड बोलत होते.
याआधी ठोस कारणाशिवाय देशात अनेकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत. हार्दिक पटेल, कन्हैय्या कुमार  ही याची ठळक उदाहरणे आहेत. परिचारक यांचे विधान देशविरोधी असून त्यांना दीड वर्ष निलंबीत करून भाजपने आपली चूक झाली, हे मान्य केले आहे. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अशी मागणी आव्हाड यांनी केली.

संबंधित लेख