राज्यात बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरू करावी हि राष्ट्रवादी़ कॉग्रेसची मागणी

10 Mar 2017 , 10:58:27 PM


राज्यात बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष, आ. दिलीप वळसे पाटील यांनी विधानभवन येथे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. जल्लिकट्टुच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी स्वतंत्र विधेयक तयार करून लवकरात लवकर शर्यतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वळसे पाटील यांनी यावेळी केली. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव साठे साहेब, बैलगाडा मालकांचे प्रतिनिधी बाळासाहेब आरुडे, संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, नवनाथ होले उपस्थित होते.

संबंधित लेख