खासदार शरद पवार यांच्या अविरत कार्याला सलाम

14 Mar 2017 , 10:47:47 PM


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सन्माननीय शरद पवार  साहेब यांच्या विधिमंडळ कारकिर्दीची सुरूवात १३ मार्च १९६७ रोजी झाली होती. १३मार्च १९६७ ला त्यांनी प्रथम विधिमंडळात आमदार म्हणून शपथ घेतली होती. आज त्या प्रवासाने सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठला आहे. तेव्हापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणि संसदेत ते अव्याहतपणे काम करत आहेत.वयाच्या २७ व्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेतलेल्या शरद पवार यांनी वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. उत्कृष्ट नेतृत्वगुण व कुशल प्रशासनाची हतोटी असलेल्या पवार साहेबांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. विकासात्मक मुद्द्यांबाबतची त्यांची आवड तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, विस्तार व विकासात्मक कार्यामधील त्यांचा उत्साह हा थक्क करणारा आहे. त्यांच्या अविरत कार्याला सलाम!!!

संबंधित लेख