सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण हे राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुवस्थेचे निदर्शक

15 Mar 2017 , 10:29:35 PM


धुळे येथील डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलतर्फे निषेध
धुळ येथील जिल्हा रुग्णालयातील रोहन ममोरकर या निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने निषेध केला आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात डॉ. ममोरकर यांच्या डोक्याला व डोळ्याला जबर मार लागला असून त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर सेल राज्यभर आंदोलन करणार असून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री  दिपक सावंत यांना भेटून याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. नरेंद्र काळे  यांनी सांगितले.
राज्यात आघाडीचे सरकार असताना डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायदा संमत झाला होता. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात राज्याचे सरकार कमी पडत आहे. सोलापूर व पुण्यापाठोपाठ धुळे येथे सरकारी डॉक्टरच्या मारहाणीचे प्रकरण घडले आहेत. सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना देखील राज्य सरकार संरक्षण पुरवू शकत नसेल तर खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांची काय अवस्था? अशी टीका काळे यांनी केली आहे.

संबंधित लेख